मुंबई मेट्रो ३ चा पहिला टप्पा डिसेंबर २३ अखेरीस पूर्ण होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.१० :- येत्या डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत मुंबई मेट्रो- ३ रेल्वेचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई मेट्रो-३ टप्प्याच्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी मार्गाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प) सुबोध गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान

मुंबई मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी महाराष्ट्रात सुखरूप परतले

मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१, २, ६ आणि ९ यांना तसेच मोनोरेलला याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आणि मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे. मेट्रो-३ रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.