२५ तारखेला डोंबिवलीत श्वानांचा फॅशन शो
डोंबिवली दि.२२ – रोटरी क्लब अपटाऊन व प्रिमियम पेटस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २५ रोजी डी.एन.सी शाळेच्या मैदानावर दुपारी ३ वाजले पासून भव्य श्वान मेळावा व फॅशन शोचे आयोजन करण्यात आले असून या मध्ये सुमारे ३०० पेक्षा जास्त श्वान सहभागी होणार आहेत. फॅशन शोमध्ये श्वान निरनिराळ्या प्रकारचे मजेदार कपडे परिधान करणार असून डोंबिवलीकरांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
हेही वाचा :- गाडी चालवताना मोबाईलवर बोलणा-याचा परवाना रद्द होणार
यात बर्फाळ प्रदेशातील सायबेरियन हस्की, उंदराच्या आकारातील लहान चिवाहुआ श्वान, माऊंटन विभागातील सेंट बर्नाड अफगाणीस्तानचा अफआऊन हाऊण्ड, पोलीसांकडे असणारे लॅब्रडार व जर्मन शेफर्ड यांचे सिक्युरिटी गार्ड डॉग, डॉबरमॅन व रोटव्हीलर यांची थरारक प्रत्यक्षिके पहायला मिळणार आहेत. या शो साठी मराठी कलाकार उपस्थित रहाणार असून विविध मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.