संघाचे ‘समर्पण’ रूपेरी पडद्यावर

मुंबई दि.०३ :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील विविध स्वयंसेवी संस्थांचे वर्षानुवर्ष चालणारे सेवाकार्य आता सर्वांपुढे येणार आहे. यावर आधारित ‘समर्पण’ ही हिंदी मालिका आजपासून (रविवार) दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. ग्रामविकास, कुष्ठनिवारण, गो-सेवा, वनवासी कल्याण, शिक्षण, कौशल्य विकास आदी क्षेत्रातील संस्थांचे काम यातून समोर येणार आहे.

हेही वाचा :- Dombivali ; महापालिका क्षेत्रातील विवीध समस्यांबाबत आमदार राजू पाटील यांनी घेतली आयुक्तांची भेट

या ५२ भागांच्या मालिकेचे प्रसारण दर रविवारी सकाळी दहा वाजता होईल. आज ३ नोव्हेंबर २०१९ (रविवारी) प्रसारित होणाऱ्या पहिल्या भागाचे सूत्रसंचालन अभिनेता विवेक ओबेरॉयने केले आहे; तर पटकथा लेखन अभिराम भडकमकर यांचे आहे. मालिकेच्या पुढील भागांमध्ये परेश रावल, सचिन खेडेकर, मनोज जोशी, सोनाली कुलकर्णी, अनुपम खेर आदी सूत्रसंचालक असतील.

हेही वाचा :- अनधिकृत कंदिल लावले असतील तर सगळ्यांचेच काढा एकाला वेगळा न्याय आणि दुस-याला वेगळा न्याय कसा…

राष्ट्रीय सेवा भारतीच्या माध्यमातून आरुषा क्रिएशन्सतर्फे एकनाथ सातपूरकर यांनी मालिकेची निर्मिती केली असून, चंद्रशेखर कुलकर्णी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. उदय जोगळेकर व ऋषिपाल गढवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मालिका तयार होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोलापूरमधील उद्योगवर्धिनी, छत्तीसगडमधील कुष्ठनिवारक संघ, गौमुखी सेवा धाम, राजकोटमधील ज्ञानप्रबोधिनी प्रकल्प आदींचे सेवाकार्य दाखविण्यात येणार आह

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email