भरधाव ट्रकच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू – डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.२४ – कल्याण शिळ रोड टाटा पावर हाउस येथे शिवाजी नगर येथे राहणारे साजिद खान काल सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास विको नाका येथून आपल्या पुतण्या व त्याचा मित्र अंकित श्रीवास्तव याच्यासोबत दुचाकीने जात होते.
हेही वाचा :- कल्याण स्कायवॉकवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तोल केल्याने साजिद याच्यासह त्यांचा मुलगा व मुलाचा मित्र अंकित असे तिघे खाली पडले. या अपघातात अंकित याला गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात ट्रकचालक दिलीप लिंगटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us: