देश सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे- मुख्तार अब्बास नक्वी

नवी दिल्ली, दि.०१ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. राजस्थानच्या किशनगढ बास येथे प्रस्तावित असलेल्या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थेचा पायाभरणी समारंभ आज नक्वी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

मोदी यांनी कधीही मतपेढीचे राजकारण केले नाही. कुठलाही भेदभाव न करता केवळ विकासाच्या निश्चयाने आमचे सरकार वाटचार करत आहे असे त्यांनी सांगितले. नक्वी यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचेही उद्‌घाटन झाले. जागतिक दर्जाच्या या शिक्षण संस्थेचे काम 2020 पर्यंत पूर्ण होईल. या शिक्षण संस्थेत कौशल्य विकास, प्राथमिक आणि उच्च शिक्षण, आयुर्वेद, युनानी विज्ञान तसेच क्रीडा सुविधा दिल्या जातील अशी माहिती नक्वी यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email