डोंबिवली अस्वच्छतेचा डाग पुसण्यासाठी ‘स्वच्छता मार्शल` संकल्पना

डोंबिवली दि.०९ – असा डाग लागल्याने कल्याण-डोंबिवलीचे स्वच भारत अभियांनाअंतर्गत शहर स्वच्छ सर्वेक्षण यादीत क्रमांक खाली गेल्याने पालिका प्रशासन यावर पाऊल उचलत आहे. ‘घाणेरडी डोंबिवली’असा डाग पुसण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात स्वच्छ सुंदर शहरासाठी ‘स्वच्छता मार्शल’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या एकूण दहा प्रभागातून सुमारे शंभर ‘स्वच्छता मार्शल’ स्वच्छतेची देखरेख करणार असून ही संकल्पना पूर्णत्वास येण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने शुक्रवारी पार पडलेल्या सभेत मंजुरी दिली.

हेही वाचा :- युवा सेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते आधुनिक पद्धतीच्‍या जमिनीखालील बंदिस्‍त कचरापेटय़ांचे उद्घाटन

ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाने अनेक सोसायटीना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. स्वच्छतेबाबत कल्याण-डोंबिवली सुधारणा होत नसल्याचे आढळून येत आहे. यावर उपाय म्हणून शहर स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता मार्शल’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. ‘स्वच्छता मार्शल’ अस्वच्छताबाबत लक्ष ठेवणार असून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करणार आहेत. ही संकल्पन इतर महापालिकेत सुरु असून स्वच्छतेसाठी एक चांगला पर्याय ठरत असून कल्याण डोंबिवली महापालिकेलाही याचा निश्चित फायदा होईल आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती या मागचा उद्धेश असल्याचे सभेत स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.