* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने २ हजार ६०० कोटी रुपयांची मदत करावी – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने २ हजार ६०० कोटी रुपयांची मदत करावी

राज्य शासनाची मागणी

मुंबई दि.२७ :- राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने सुमारे २ हजार ६०० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीची तातडीने पाहणी करून मदत देण्याची मागणी करणारा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाने केंद्र सरकारला पाठविला असल्याचे सांगण्यात येते. ऑक्टोबर महिन्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.

बोरिवली- विरार पाचवी, सहावी मार्गिका; खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची काम करण्यास ‘एमआरव्हीसी’ ला मान्यता

त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी आणखी १७८ तालुक्यांतील ९५९ महसुली मंडळांत दुष्ळाळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपमसितीच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या भागांत जमीन महसूलात सवलत, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी आदी सवलती लागू करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्याच्या विविध भागांतून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली असून, पुढील आठवडय़ात आणखी काही महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *