ठाण्याच्या एपिकाँन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीस २०१९ चा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान
{म.विजय}
ठाणे दि.०६ :- देशात इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स या १९२० साली स्थापन झालेल्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थे तर्फे शतकपूर्ती वर्षात हा पुरस्कार ठाण्याच्या एपिकाँन कन्सल्टन्सी या कंपनीस प्राप्त झाला आहे. काल (दि.६ नोव्हेम्बर २०१९) दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एपिकाँन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चे संचालक जयंत कुलकर्णी, अरविंद परुळेकर, यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हेही वाचा :- या क्रमांकाच्या गाड्या होणार मुलुंडनाक्यावर टोल फ्री..
एपिकाँन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी सन १९२० साली स्थापन झाली असून अनेक गृहनिर्माण संस्था , सार्वजनिक प्रकल्प यांच्या बांधकामाच्या विशेषतः स्ट्रक्चर व स्लॅब यांची गुणवत्ता राखली जाते की नाही हे इमारतीच्या बांधकामातील महत्वपूर्ण काम एपिकाँन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अत्यंत इमानदारीने व सचोटीने करत आहे. या क्षेत्रात एपिकाँन कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.
हेही वाचा :- क्षयरोग चाचणीचे सीबीनॅट अत्याधुनिक मशीन कार्यान्वित दोन तासात होणार क्षयरोगाचे निदान
कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता अत्यंत व्यावसायिक पणे हे कौशल्यपूर्ण काम सातत्याने करत असल्याबद्दल तसेच हे करत असताना आपली सामाजिक दायित्वाबद्दलची जबाबदारी पार पाडते यासाठी हे मानाचे पारितोषिक देण्यात येत आहे. दिल्ली येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नामदार श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.