गुढीपाडवाचे औचित्य साधून चित्रकलेचे प्रदर्शन

उरण दि.३१ – नवोदित चित्रकलाकारांना आपल्या कलेत वाव मिळावा,त्यांना प्रोत्साहन मिळावे, उरण तालुक्यात कलेचे वातावरण निर्माण व्हावे या दृष्टिकोणातुन गुढीपाडव्याचे औचित्य साधून दि 6/4/2019 व दि 7/4/2019 रोजी सकाळी 9 ते रात्री 8 यावेळेत आर्ट क्रिएशन या उरण मधील नामवंत कला संस्थेतर्फे ब्राह्मण सभागृह,गणपती चौक उरण शहर येथे चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात जलरंग, तैलरंग, ऑइलपेंट,एक्रेलिक प्रकारातील रचनाचित्र,निसर्गचित्र,व्यक्तिचित्र आदि चित्रांचा समावेश असून हे प्रदर्शन आर्ट क्रिएशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रूपेश पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय चित्रकार रूपेश पाटिल यांच्या ‘आर्ट क्रिएशन’ मधील विद्यार्थ्यांनी बनविलेली छायाचित्रे, पेंटिग्स प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. उदघाटक म्हणून प्रसिद्ध चित्रकार जितु गायकवाड(पेण)यांची उपस्थिति लाभणार आहे. आर्ट क्रिएशन द्वारा तयार केलेल्या चित्रांना अनेक ठिकाणी मागणी आहे. मुंबई मध्येही संस्थेचे अनेकदा प्रदर्शन झाले आहे त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय चित्रकार रूपे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email