‘बेस्ट’ उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
मुंबई दि.०४ :- बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असून आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. ‘बेस्ट’च्या २७ पैकी १८ आगारांमध्ये ‘काम बंद’ आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे एक हजारांहून अधिक बसगाड्या आगारातच उभ्या आहेत. बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतीक्षानगर, आणिक, धारावी, काळाकिल्ला, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठाणे या आगारांमध्ये हे आंदोलन सुरू आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून अमानुष मारहाण
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वतःच्या मालकीच्या एकूण १ हजार ३९० आणि भाडेतत्त्वावरील १ हजार ६७१ अशा एकूण ३ हजार ०६१ बसगाड्या आहेत. आंदोलनाला विविध आगारांमधील कंत्राटी कामगारांचा पाठींबा मिळू लागला असून आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. आंदोलनात एसएमटी, मातेश्वरी, टाटा, हंसा, ओलेक्ट्रा, आणि स्विच या व्यवसाय संस्थेच्या कामगारांचा सहभागी झाले आहेत. या व्यवसाय संस्थांविरुद्ध कंत्राटातील अटी व शर्तींनुसार कारवाई करण्यात येत आहे. कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश या संस्थाना देण्यात आले आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.