‘त्या’ ब्लॅकमेलर महिलेला अटक

नगर- बलात्काराच्या गुन्ह्यात असणाऱ्या आरोपींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी विवस्त्र करून व्हिडिओ काढल्याचा बनाव केल्याच्या गुन्ह्यात बुधवारी पीडित महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. या महिलेला १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

जुन्या गुन्ह्यात नातेवाईक असलेल्या आरोपींकडून पैसे मिळविण्यासाठी पती-पत्नीने स्वतःचा व्हिडिओ तिघा मित्रांच्या मदतीने तयार केला होता. त्यानुसार पीडित महिलेच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासात हा सर्व बनाव असल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर पती-पत्नी व त्यांचे तीन मित्र अशा पाच जणांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चार जणांना अटक करण्यात आली होती. पीडित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते.

पीडित महिलेच्या पतीचे तीन मित्र न्यायालयीन कोठडीत आहेत. तर पतीला १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. पीडित महिलेवर सिव्हिल हॉस्पिटमध्ये उपचार करण्यात आल्यानंतर तीला बुधवारी तपास अधिकारी संदीप मिटके यांनी अटक केली.

तिला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर दुपारी हजर करण्यात आले आहे. या महिलेचा या गुन्ह्यात किती सहभाग आहे, याचा तपास करायचा असल्याने महिलेला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकारी मिटके यांनी केली होती. त्यानुसार महिलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.