ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी ब.भि.नेमाने
ठाणे दि.०७ – ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी ब.भि.नेमाने यांची नियुक्ती झाली. आज प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी त्यांना अतिरिक्त पदाची सुत्रे सुपुर्द केली. यावेळी सर्व विभाग प्रमुखांनी नेमाने यांची भेट घेवून त्यांचे स्वागत केले. नेमाने हे मुळचे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील असून ते १९९२ साली लोकसेवा आयोगाची परिक्षा उतीर्ण होवून प्रशासकीय सेवेत रुजु झाले.
हेही वाचा :- बारवी धरणामुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबियांना सुमारे २५ कोटींचे वाटप
त्यांनी यापुर्वी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), प्रकल्प संचालक, महिला बाल विकास अधिकारी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उप आयुक्त अशी विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. नेमाने यांना प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असून बचत गटांच्या सक्षमीकरणाच्या योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाच्या वतीने यशवंत पंचायतराज अभियाना अंतर्गत देण्यात येणारागुणवंत अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. शिवाय नेमाने यांनी पाणलोट क्षेत्रात देखिल विशेष योगदान दिले आहे.