Thane ; नशा करण्यासाठी ६० किलो कांद्यांची चोरी

ठाणे दि.११ :- कांदा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच भाव खातोय. एरव्ही दुकानाबाहेर असलेल्या कांद्याच्या गोणींकडे दुकानदार लक्ष देत नाही. पण आता दिवस बदललेत. दुकानदार दुकानातल्या वस्तूंपेक्षा कांद्यावर जास्त लक्ष देऊ लागलेत. कारण गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचा भाव वाढलाय. साहजिकच कांद्याचे भाव वाढल्यानं कांद्यावर चोरट्यांची नजर गेली आहे.

हेही वाचा :- भाजपाने आपला मोठा मित्र गमावलाय, भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल – संजय राऊत

ठाण्यातल्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याची चोरी होऊ लागली आहे. महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये कांद्याची गोण घेऊन जाणाऱ्या दोन जणांना गस्तीवरच्या पोलिसांनी हटकलं. त्यांच्याजवळचा ६० किलो कांदा चोरीचा असल्याचं तपासात स्पष्ट झालं. पोलिसांनी अविनाश कदम आणि रितेश पवार या दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. नशा करण्यासाठी माणूस कोणत्याही पातळीवर जातो हे सांगतायेत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.