ठाण्यात २५०० किलो प्लास्टिक जप्त,९५ हजार रूपयांचा दंड वसूल 

प्लास्टिकविरोधात ठाणे महानगरपालिकेची कठोर कारवाई

(म.विजय)

ठाणे – राज्य शासनाने प्लास्टिकविरोधात घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कठोर कारवाईमध्ये जवळपास २५०० किलो इतके प्लास्टिक जप्त करण्यात आले असून अंदाजे ९५ हजार रूपयांचा दंड वसूल केला. दरम्यान महापालिकेच्यावतीने सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये प्लास्टिक संकलन केंद्रे तसेच प्लास्टिक संकलन वाहनाच्या माध्यमातून प्लास्टिक संकलन करण्यात येत असून नागरिकांना त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

राज्य शासनाने २३ जूनपासून प्लास्टिक आणि थर्माकोलविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व प्रभाग समिती स्तरावर प्लास्टिक व थर्माकोलविरूद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते
त्यानुसार आज महापालिकेच्या सर्व प्रभाग स्तरावर सहाय्यक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक यांच्या पथकांनी कडक कारवाई केली. या कारवाईमध्ये १०० पेक्षा जास्त दुकानदार व विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या व्हाटस् अॅप क्रमांकावर जवळपास ७५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यावरही कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या कारवाईमध्ये जमा झालेले जवळपास २५०० किलो प्लास्टिक महापालिकेच्या सुका कचरा संकलन केंद्राच्या माध्यमातून नियमानुसार पुनर्चक्रीकरण करण्यात येणार आहे तसेच त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
दरम्यान प्लास्टिक वस्तूंना पर्यायी वस्तूंची माहिती व सदर वस्तू पुरविणारे उत्पादक व पुरवठादार यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email