खुनासह दरोडा टाकणारी टोळी गजाआड ठाणे ग्रामीण पोलीसांची कारवाई

ठाणे दि.११ – ट्रक चालकाचा खुन करून त्याचा ट्रक पळवून त्यातील सिमेंट ब्लॉक दरोडा टाकुन चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. दिनांक 26/02/2019 रोजी सकाळी 11 च्या सुमारास भिवंडी गंगाराम पाडा वडपे येथील बिग ब्लॉक कंपनी ऊमरगा , गुजरात यांचा ट्रक भिवंडी शहापूर ह्या रोड वरील शान्ग्रिला रिसॉर्ट च्या समोर बेवारस पध्दतीने उभा होता , त्या ट्रकच्या ड्रायव्हर साइडच्या क्लीनर सीटवर ड्रायव्हरचाच़ म्रुतदेह आढळून आला होता , त्या नुसार भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे 302,396 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ह्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी स्थानीक गुन्हे शाखेस समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा :- नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा 12 ते 15 मार्च दरम्यान ब्रिटन भेटीवर

त्या प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे , अविनाश पाटील , पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे यांची पथके नेमून हा गुन्हा उघडकीस आणण्याचा सूचना दिल्या होत्या , या पथकाने काहीही माहीती नसताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढुन महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून खनिवडे , तलासरी, मुंबई गोवंडी व भिवंडी येथे या गुन्ह्यांशी सबंध असलेले इसम मोहम्मद अजमल वसीअहमद शेख वय 36 राहणार तलासरी, मोहम्मद शाकीररियाज अहमद शेख वय 30 वर्ष राहणार गोवंडी मुंबई, जहानबेज आमिनखान वय 23 राहणार भिवंडी, इम्रान अलील खान वय 35 राहणार पठाण चाळ भिवंडी, कैफ अहमद अल्ताफ शेख वय 33 शांतीनगर भिवंडी यांना ताब्यात घेतले .त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले कैफ अहमद अल्ताफ शेख याने त्यांना 10 हजार रुपये अड्वान्स दिले होते आणि सिमेंट ब्लॉक आणुन देण्यास सांगीतले होते, त्या प्रमाणे ते सावज शोधत असताना.

हेही वाचा :- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 50 व्या स्थापना दिनाला पंतप्रधानांची उपस्थिती

त्यांना ट्रक क्रमांक एमएच 48 एजी , 7410 हा ट्रक रस्त्यावरून सिमेंट ब्लॉक घेउन जात असताना वरील आरोपींनी त्याला अडवले व लिफ्ट देण्या बद्दल विचारले , तेव्हा ड्रायव्हर सुभाष छबीराव यादव हा त्यांचा ओळखीचा निघाला , ओळखीचे असल्याने त्यांनी ह्या दोन आरोपींना आपल्या ट्रक मध्ये बसवले , पुढे गेल्यावर लघुशंका करण्याच्या बहाण्याने ते थांबले , ड्रायव्हर सुभाष यादव हा गाडीत चढत असताना त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याला ठार मारले , त्याची बॉडी क्लिनर सीटवर ठेऊन ट्रक घेउन , त्या ट्रक मधिल 915 सिमेंटचे ब्लॉक रोड वर उतरवून ट्रक शान्ग्रिला रिसॉर्ट समोरिल रोड वर उभा केला, ड्रायव्हरचा म्रुतदेहा सकट ट्रक तिथेच सोडुन पळुन गेले , त्यांचा सिमेंट ब्लॉक चोरी करण्याचा उद्धेष होता , पण त्यांनी अडवलेला सिमेंटचा ट्रकचा ड्रायव्हर हा ओळखीचा असल्याने , त्यांनी ड्रायव्हरलाच़ ठार मारले व ब्लॉक चोरले .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email