मुंबईत आजपासून दहा टक्के पाणीकपात
मुंबई, दि. १
मुंबईत आजपासून दहा टक्के पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा घालवल्यामुळे महापालिका प्रशासनाने ही पाणीकपात करण्याचा निर्णय जूनच्या शेवटच्या आठवड्यात घेतला होता.
पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून त्याला पण मधील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे मात्र तरीही आजपासून ही पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
धरण क्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली असून हा पाणीसाठा आता १०.८८ टक्के इतका झाला आहे. हा पाणीसाठा सहा टक्क्यांपर्यंत खाली गेला होता.