पश्चिम रेल्वेवर आणखी दहा वातानुकूलित लोकल फेऱ्या

 

आसपास मुंबई प्रतिनिधी
मुंबई-पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या आणखी दहा फेऱ्या वाढणार आहेत. एक नवीन वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेच्या सेवेत दाखल होणार आहे.

प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेने १ ऑक्टोबरपासून सामान्य लोकल फेऱ्यांऐवजी ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ७९ झाली आहे.

सध्या पश्चिम रेल्वेकडे सहा वातानुकूलित लोकल असून आता आणखी एक वातानुकुलीत लोकल सेवेत दाखल होणार आहे. या लोकलच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चाचण्या पूर्ण झाल्या असून ती चालविण्याचे नियोजन केले जात आहे. या लोकलच्या दहा फेऱ्या होणार आहेत.

वातानुकूलित लोकलच्या दररोजच्या तिकीट विक्रितही वाढ झाली असून ४ ऑक्टोबर रोजी १८ हजार ६५८ तिकीटांची विक्री झाली होती. तर १७ ऑक्टोबर रोजी सर्वाधिक म्हणजे १९ हजार ७६६ तिकीटांची विक्री झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.