तांत्रिक अज़ीज़ अब्दुल बाबाने केला आईसह तिन्ही मुलींवर बलात्कार

 

नाशिक : मुलीचं लग्न जमत नसल्याने भोंदूबाबाकडे गेलेल्या महिलेसह तिच्या तीन मुलींवर भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात घडला आहे. तब्बल २ वर्ष ४ महिने नराधम आरोपी सदर कुटुंबावर अत्याचार करत होते. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येवला तालुक्यातील एका तरुणीचं लग्न जमत नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या आईने अंधश्रद्धेतून अजीज अब्दुल बाबा याच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. हा बाबा आपल्याला अडचणीतून मार्ग काढायला मदत करेल, अशी आशा सदर महिलेला होती. मात्र या नराधमाने आणि त्याचा भाऊ जब्बार शेख याने चाकूचा धाक दाखवत महिलेसह तिच्या तीन मुलींवर बलात्कार केला.

बलात्कारानंतर या आरोपींनी महिलेचे व्हिडिओही काढले होते. या व्हिडिओच्या माध्यमातून बदनामीची धमकी देत अनेक दिवस महिलेवर अत्याचार सुरू होते. अखेर पीडित महिलेने धाडस करून पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.