* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> इस्रायलवरील आक्रमणापासून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

इस्रायलवरील आक्रमणापासून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक

ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे प्रतिपादन

मुंबई दि.३१ :- इस्रायलवर हमासने केलेल्या आक्रमणापासून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन युद्ध सेवा मेडल प्राप्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘सेक्युलॅरिझमच्या आड हमासचे समर्थन’ या विषयावरील विशेष संवादात ते बोलत होते. हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर आक्रमण करणे हे इस्रायलच्या ‘मोसाद’ या विश्वभर प्रसिद्ध असलेल्या गुप्तचर संघटनेचे मोठे अपयश आहे.

ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना उद्यापासून दाखले द्यायला सुररुवात

इस्रायलने गुप्तचर क्षेत्रात तांत्रिक बाबींवर अधिक भर दिला आणि मानवी गुप्तचर क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. गाझापट्टीतून इस्रायलमध्ये प्रतिदिन कामासाठी येणार्‍या हजारो नागरिकांनी हमाससाठी गुप्तचर म्हणून काम केले आणि इस्रायलची युद्धासाठी सिद्धता नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर हमासने आक्रमण केले, असे महाजन यांनी सांगितले.

आमदार अपात्रता प्रकरणी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा

इस्रायलने त्याच्या शत्रूला कमी लेखले. शत्रूचा उद्देश समजून घेतला नाही, तर इस्रायलमधील लोक आपापसात लढत राहिले. इस्रायलच्या या सर्व चुकांमध्ये भारताने खूप काही शिकण्यासारखे आहे. भारतीयांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शिकवणीनुसार कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची नागरिकांमध्ये सिद्धता निर्माण केली पाहिजे, असेही महाजन म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्या – महाविकास आघाडीच्या नेत्यांचे राज्यपाल बैस यांना निवेदन

पाकिस्तान, चीन या परकीय शत्रूंबरोबरच देशाअंतर्गत कार्यरत असलेले नक्षलवादी, पाकसमर्थक, आतंकवादी आदी देशविरोधी शक्तींच्या विरोधात भारताने लढले पाहिजे. ज्याची जशी वागणूक आहे, त्यानुसारच त्याच्याशी वागावे लागते. ज्यांनी भारताचे दोन तुकडे केले, त्यांना भारतात आज विशेषाधिकार देण्यात येत आहेत. यासाठी देशातील काही कायदे बदलले पाहिजेत, असे सैन्यदलातील सेवानिवृत्त मेजर सरस त्रिपाठी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *