सरकारला वेळ नसेल तर नवी मुंबई मेट्रोचे उदघाटन आम्ही करू- विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. २५
नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. पंतप्रधानांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोर खेळ सुरू आहे.

सरकारला वेळ मिळत नसेल तर नवी मुंबई मेट्रोचे उदघाटन आम्ही करू, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी न केलेल्या कामांच्या उदघाटनाचा धडाका लावला आहे. या सरकारला हा नैतिक अधिकार कोणी दिला? असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

आघाडी सरकारच्या काळात मेट्रो प्रकल्पांची मूहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १२ वर्षे नवी मुंबईकरांनी मेट्रोची वाट पाहिली. १३, १४ आणि त्यानंतर १७ ऑक्टोबर अशा तीन तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. पण सरकारने नवी मुंबईकरांची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले, असेही वडेट्टीवार म्हणाले.