मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात अवघा १२.७३ टक्के पाणीसाठा

मुंबई, दि. २३
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात राखीव साठ्यासह १२.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा
केवळ ३६ दिवस पुरेल इतकाच असून आता मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

मुंबईला दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या तलावातून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. भातसा व उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

शिल्लक पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरणार आहे. जून महिना संपायला काही दिवस राहिले आहेत. लवकरात लवकर जोरदार पाऊस सुरू झाला नाही तर पाणीकपात केली जाण्याची शक्यता आहे.
——–

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बुध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा

मुंबई दि.०५ :- भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत

भगवान गौतम बुद्धांनीदिलेल्या पंचशील तत्वांचा अंगीकार हा सगळ्यांच्याच उत्थानाचा मार्ग असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा २ हजार २०६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

कल्याण दि.२४ :- कल्याण डोंबिवली महापालिकेचा २ हजार २०६ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी महापालिका सभागृहात सादर केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची पुन्हा ‘ईडी’ चौकशी

गेल्यावर्षी १ हजार ७७३ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला होता. त्यापैकी १ हजार ६७५ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. १ हजार ३८७ कोटी रुपये विविध विकासकामांवर खर्च करण्यात आले असून सध्या पालिकेकडे २८७ कोटी रुपये शिल्लक आहेत.

मुंबईतील तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांत गुढीपाडव्याला १ हजार ३१९ नव्या वाहनांची नोंद

गेल्या वर्षीच्या जमा खर्चाच्या तुलनेत यंदा ४३२ कोटी रुपयांनी महापालिका प्रशासनाने वाढ केली आहे. अपूर्ण कामांना प्राधान्य देणारा, आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापन यावर भर देणारा असा हा अर्थसंकल्प आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन

मुंबई दि.०६ :- सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादीत न राहता कला-क्रीडा गुणांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करावा असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी केले.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समालोचक वि. वि. करमरकर यांचे निधन

बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य २०२३’ या कला आणि क्रीडा आविष्कारांचा सांस्कृतिक सोहळा रविवारी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलातील सरदार वल्लभाई पटेल डोम स्टेडियम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

‘म्हाडा’ कोकण मंडळाच्या घरांसाठी येत्या १० मे रोजी सोडत; उद्या जाहिरात

या सोहळ्यास शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजहंस सिंह, सहआयुक्त (शिक्षण) (अतिरिक्त कार्यभार) अजित कुंभार, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, अभिनेते प्रसाद ओक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

समृद्ध इतिहास असणाऱ्या मराठी भाषेचे संवर्धन करणे आपले कर्तव्य – डॉ सदानंद मोरे

महापालिका नाट्यगृहे परिसरात पुस्तक विक्रीला सुरवात

मुंबई दि.२८ :- आपली मराठी भाषा समृद्ध असून या भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास लाभला आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन करणे हे आपले कर्तव्‍य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी येथे केले.  बृहन्मुंबई महापालिकेने महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमात ते बोलत होते.

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तातडीची बैठक- मुख्यमंत्री शिंदे

सातवाहनकालीन प्रशासकीय मराठी ते आजच्या २१ व्या शतकात वापरात येणाऱ्या मराठी भाषेचा विकास या विषयावर विविध उदाहरणांसहित इतिहासातील अनेक दाखले, संदर्भ याचे विवेचन त्यांनी केले. सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी प्रास्ताविक केले.

‘कोण होणार करोडपती’चे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला – सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया २ मार्चपासून

या कार्यक्रमात दुरदृश्य प्रणालीद्वारे विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथील पुस्तक विक्री दालनाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांच्या तर बोरिवली(पश्चिम) परिसरातील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथील पुस्तक विक्री दालनाचा शुभारंभ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

‘भगूर ते अंदमान’ या विषयावर चित्र प्रदर्शन

मुंबई दि.२५ :- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘अनबिलिव्हेबल सावरकर’ भगूर ते अंदमान या विषयावरील योगेंद्र आर. पाटील यांचे चित्रप्रदर्शन सुरू झाले आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावबदलास केंद्र शासनाची मंजुरी

स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात असिलता सावरकर – राजे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी चित्रप्रदर्शानाचे उदघाटन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गजानन शेपाल, ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हे प्रदर्शन सर्वांना येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर पश्चिम येथे भरविण्यात आले आहे.

घर खरेदीदारांकडून आगाऊ देखभाल शुल्क घेणे बंद व्हावे – मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

मुंबई दि.१५ :- घर खरेदीदारांकडून आगाऊ देखभाल शुल्क आकारणे ‘रेरा’ कायद्याशी विसंगत असून ही पद्धत बंद करावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने ‘महारेरा’चे अध्यक्ष अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. रेरा कायद्याच्या कलम ११ (४) (इ) नुसार, गृहप्रकल्पातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त सदनिकांची विक्री झाल्यावर विकासकाने घर खरेदीदार ग्राहकांची सहकारी संस्था स्थापन करण्याचे बंधन कायद्यात आहे.

बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहर आणि उपनगरात ५५ इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग केंद्रे उभारण्यात येणार

मात्र याला न जुमानता घराचा ताबा देताना घर खरेदीदारांकडून एक वा दोन वर्षांचा इमारतीचा देखभाल खर्च विकासकाकडून आगाऊ वसूल केला जात आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक सदनिकांची विक्री झाल्यानंतर विकासकाने सहकारी संस्था स्थापन करून देण्याचे कायदेशीर बंधन पाळले तर घराचा ताबा देताना घर खरेदीदारांची सहकारी संस्था अस्तित्वात येऊ शकते.

एअर इंडिया ४७० विमाने खरेदी करणार

त्यामुळे सदनिकांचा ताबा घेतल्यावर इमारतीच्या देखभालीची जबाबदारीही घर खरेदीदारांची संस्थेवरच येते. आणि त्यांनी ती घ्यावी, असे रेरा कायद्यात अभिप्रेत आहे. आणि तरीही विकासकाकडून आगाऊ देखभाल शुल्क घेतले जाते ते अयोग्य आहे, असे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी म्हटले आहे. ५० टक्यांहून अधिक सदनिकांची विक्री होताच सहकारी संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबतही विकासकांना आदेश देण्यात यावे, अशी मागणीही मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.

नागरी अभिवादन न्यासातर्फे ज्येष्ठ आणि तरुणांचा नागरी सत्कार

डोंबिवली दि.१३ :- नागरी अभिवादन न्यास, डोंबिवलीतर्फे येत्या १९ फेब्रुवारी रोजी डोंबिवली शहरासाठी निरलसपणें काम करणाऱ्या ज्येष्ठांचा, तरुणांचा आणि एका संस्थेचा सन्मान केला जाणार आहे. टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक या अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री रमेश पतंगे उपस्थित राहणार आहेत.

वि.बा आलोणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येत्या रविवारी ‘पेशकार’

या कार्यक्रमात सुभाष मुंदडा(ग्रंथालय व्यवस्थापन),सुरेश फाटक (वनवासी कल्याण), श्रीकांत पावगी (शिक्षण ,पत्रकारिता) आणि डॉ अंजली आपटे(दिव्यांग सेवा,) तर ज्येष्ठांचा, युवाचैतन्य सन्मानाने रुपाली शाईवाले(पर्यावरण), अमोल पोतदार(शिक्षण) राही पाखले (सुवर्णपदक जिमनास्ट) यांचा सन्मान केला जाणार आहे.

गिरणी कामगार आणि वारसदारांचा मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी मोर्चा

तर संस्था सत्कारसाठी विवेकानंद सेवा मंडळ यांची निवड करण्यात आली आहे. गजानन माने यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी विशेष सत्कार होणार आहे
डोंबिवली शहरातील ४७ संस्थांनी स्थापन केलेल्या नागरी अभिवादन न्यास या शिखर संस्थेतर्फे २०१४ पासून नागरी
अभिवादन सोहळा आयोजित करण्यात येत आहे.

‘मनसे’च्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यात कार्यक्रम; राज ठाकरे उपस्थित राहणार

मुंबई दि.१३ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन येत्या ९ मार्च रोजी ठाणे येथे गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

मालाड येथील झोपडपट्टीला आग

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा झाली होती. राज्यातील मशिदींवरील भोंग्यांसदर्भात मुद्दा या सभेत त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर राज्यभरात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात आले होते.

दूरध्वनी टॅपिंगप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांना महासंचालकपदी बढती

बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक आणि पुढील राजकीय समीकरणे याविषयी राज ठाकरे या कार्यक्रमात काही घोषणा करतात का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मालाड येथील झोपडपट्टीला आग

मुंबई दि.१३ :- मालाड येथील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत पन्नासहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही.

दूरध्वनी टॅपिंगप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांना महासंचालकपदी बढती
मालाड येथे कुरार व्हिलेज परिसरात ही झोपडपट्टी आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाल्या नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली.