आयसीसी जागतिक चषक सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.२५ :- आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये जून महिन्यात अंतिम सामना खेळणार आहे.

कुलकर्णी परिवारातर्फे २९ एप्रिलरोजी ‘गझलभान’ कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी झालेल्या पहिल्या WTC च्या अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्याची आणखी एक संधी साधून आली आहे.

पोलीस दलात फेरबदल, सदानंद दाते यांना महासंचालकपदी बढती

भारतीय संघ पुढीलप्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

श्रीलंकेबरोबरच्या क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.२८ :- श्रीलंकेबरोबर पुढील आठवड्यात सुरु होणा-या क्रिकेट सामन्यांसाठीचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. टी ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठीचे संघ जाहीर झाले असून टीट्वेंटीसाठी हार्दिक पंड्या तर एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्मा यांच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका

रोहित शर्मा आणि विराट कोहली या ज्येष्ठ खेळाडूंना टीट्वेंटीसाठी विश्रांती देण्यात आली असून शिवम मावी आणि मुकेश कुमार या नवोदितांना संधी देण्यात आली आहे. पहिला टीट्वेंटी सामना येत्या ३ जानेवारीला मुंबईत, दुसरा सामना पुण्यात ५ जानेवारीला तर तिसरा सामना राजकोटमधे ७ जानेवारीला होणार आहे. श्रीलंकेबरोबर एक दिवसीय ३ सामने होणार आहेत. त्यातला पहिला गुवाहाटी येथे येत्या १०, दुसरा कोलकात्यात १२ तर तिसरा तिरुवअनंतपुरम् येथे १५ जानेवारीला होणार आहे.