अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील ललित पाटीलला अटक; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई दि.१८ :- अमली पदार्थांच्या तस्करीचा गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी सकाळी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने ललित पाटीलला येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तुम्हाला जो मुख्यमंत्री हवाय, त्यासाठी कामाला लागा – भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सूचक इशारा

अमली पदार्थांचे उत्पादन आणि त्यांचा पुरवठा यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा करून ही अटक केली आहे.‌ याप्रकरणी आत्तापर्यंत १४ जणांना अटक केली असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

उपनगरी रेल्वे स्थानकात २२ ऑक्टोबरपर्यंत ‘रेलनीर’चा पुरवठा बंद; त्याच किंमतीत अन्य पर्याय

दरम्यान मी पळालो नाही, तर मला पळवून लावले गेले. यात कुणाकुणाचा सहभाग आहे त्या सर्वांची नावे सांगणार आहे, असे ललित पाटीलने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा मोर्च पोलिसांकडून मोर्चेकरी ताब्यात

मुंबई दि.१२ – मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवाजी उद्यानात दसरा मेळावा घेण्यास ‘उबाठा’ गटाला महापालिका प्रशासनाची परवानगी

मोर्चा गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानापर्यंत जाणार होता. मोर्चेकरी गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबाळे चौकात जमले. येथून मोर्चाला सुरुवात झाली. मात्र पोलिसांनी काही अंतरावरच मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले.

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतील आठ जणांना अटक

मुंबई दि.०५ :- गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतील आठ जणांना वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.
टोळीतील आठही आरोपी पश्चिम बंगालचे रहिवासी असून पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. टोळीतील काही आरोपी टिळकनगर रेल्वे स्थानकाबाहेर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

‘खलिस्तान काल,आज आणि उद्या’ या विषयावर अनय जोगळेकर यांचे शनिवारी व्याख्यान

पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली. सफिक गायन (३७), अजिजूल लक्षर (३५), अलमगीर हुसेन (४७) आणि अबू तडफदार (३७) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चौकशीत अन्य काही साथिदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी जहांगीर मौला (३७), आशिष प्रधान (३८), मनरुळ शेख (२५) आणि जावेद अख्तर (२५) या चौघांना अटक केली.

मुंबई विमानतळावर साडेचार कोटी रुपयांचे साडेसात किलो सोने जप्त; सहा जणांना अटक

मुंबई दि.११ :- महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर साडेसात किलो सोने जप्त केले असून सोन्याच्या या तस्करीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत साडेचार कोटी रुपये असून आरोपींमध्ये विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आठपदरी करण्याचा प्रस्ताव

दुबई येथून आलेल्या प्रवाशाकडे मोठ्याप्रमाणात सोने असून त्याला विमान कंपनीचा कर्मचारी तस्करीत मदत करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विमान कंपनीत सुरक्षा विभागात काम करणाऱ्या उमर शेख याची तपासणी केली असता त्याच्या बुटांमध्ये १७०० ग्रॅम सोने सापडले. हे सोने जमीर तांबे नावाच्या प्रवाशाने आसनाखाली लपवले होते आणि विमानतळाबाहेर काढण्यास शेखला सांगण्यात आले होते.

मुंबईकरांवरील पाणी कपातीचे सावट सध्या तरी दूर – सातही तलावांमधील पाणीसाठा आता ९७ टक्के

शेखच्या चौकशीतून यासीर डफेदारचे नाव समोर आले. सोने विमानातून बाहेर काढण्यासाठी शेखला ५० हजार रुपये मिळणार होते. याप्रकरणी फुकेटवरून आलेल्या आणखी एक प्रवासी मोहित लोटवानी याच्याकडूनही सोने स्वीकारण्यास शेखला सांगण्यात आले होते. त्या प्रवाशाने आणलेले १७०० ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले आहे. आरोपींना सोने वितळवण्यास मदत करणाऱ्या अमर लाल व किशोरकुमार लाल या दोन पिता-पुत्रांनाही अटक करण्यात आली आहे.

Dombiavli ; पत्रकाराला लागला डान्सबारचा नाद, घरफोडी प्रकरणात पत्रकार रोशन जाधवला अटक

डोंबिवली दि.१३ :- डान्सबार मधील बारबालांवर नोटाची उधळण करून मजा करण्याच्या नादात प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारा पत्रकार अट्टल घरफोड्या बनल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे डान्सबारमधील बारबालांची हौस पूर्ण करण्यासाठी एक उच्चशिक्षित पत्रकाराने घरफोडीचा मार्ग निवडल्याने पोलीसही चक्रावून गेले. रोशन जाधव (वय ३२, रा. डोंबिवली ) असे घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे.

अपंग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतले, नोकरीही लागली, मात्र याच दरम्यान डान्सबारमधील बारबालांचे व्यसन जडले. हौस पूर्ण करण्यासाठी एक उच्चशिक्षित पत्रकाराने घरफोडीचा मार्ग निवडल्याने पोलिसही चक्रावून गेले. रोशन जाधव (वय ३२, रा. डोंबिवली ) असे घरफोडीच्या गुन्हा अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या तरुणाला अखेर खडकपाडा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.  त्याचे 8 गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. रोशन हा डोंबिवलीतील निलजे गावचा रहिवासी आहे.

मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

या तरुणाने पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतले असून काही वर्षांपासून तो एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होता. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहने परिसरात घरफोडी करून अज्ञात आरोपींनी सुमारे 35 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. चोरीच्या घटनात वाढ : याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गेल्या महिनाभरापासून या परिसरात घरफोडी, चोरीच्या घटना सातत्याने घडत असून, त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

मेट्रो २ अ च्या मार्गावरील तीन स्थानकांची नावे बदलली

परिसरात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला सापळा रचून अटक केली होती. या इसमाकडे चौकशी केली असता त्याने ठाणे जिल्ह्यातील मोहने, आंबिवली, टिटवाळा, शहापूर परिसरात दिवसा घरफोडी, चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच आरोपी हा रोजचा घरफोडी करणारा चोर असून एकटाच इमारतीत घुसून दिवसा घरफोडी करत असे. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नमूद गुन्ह्याच्या तपासात एकूण 8 गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये 47 तोळे (470 ग्रॅम) सोन्याचे दागिने, 1 लॅपटॉप, 1 मोबाईल फोन, दोन महागडी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.

अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक

मुंबई दि.२० :- अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. जयसिंघानीला मुंबईत आणण्यात आले असून त्याला मलबार हिल पोलिसांकडेही सुपूर्द करण्यात आले आहे.

ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात स्थानिकांवर गोळीबार

जयसिंघानी बऱ्याच वर्षांपासून फरार होता. मुंबई पोलिसांनी पाच दिवसांची शोध मोहीम राबवून त्याला अटक केली. गुजरात पोलिसांच्या मदतीने जयसिंघानीला गुजरात राज्यातील कलोल येथे अटक करण्यात आली.

घर खरेदी-विक्रीचे व्यवहार करणा-या एजंटांना महारेराचे प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक

जयसिंघानीकडून भ्रमणध्वनी, चारचाकी वाहन, विविध उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जयसिंघानीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये एकूण १५ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून मुंबईत पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मुंबई पोलिसांकडून ५१ फरारी आरोपींना अटक

मुंबई दि.२५ :- मुंबई पोलिसांनी मंगळवारी केलेल्या धडक कारवाईत ५१ फरारी आरोपींना बेड्या ठोकल्या. अवैध मद्य विक्री, अनधिकृत फेरीवाले, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मंगळवारी रात्री अकरा वाजल्यापासून ही धडक कारवाई सुरू केली.

गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या समाधी परिसरात ‘स्वराज्यभूमी’ नामफलक नाही

मुंबईतीच्या पाचही प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त, १४ परिमंडळीय पोलीस उपायुक्त, पोलीस उपायुक्त विशेष शाखा सुरक्षा, २८ विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त; शिवाजी पार्क परिसरात ‘नो फ्लाय झोन’

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‌ही कारवाई करण्यात आली.

मॉडेलचे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल केल्याप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला अटक

मुंबई दि.१९ :- अभिनेत्री राखी सावंत हिला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर आहे.

महापालिकेतर्फे भांडूप येथे नव्या रुग्णालयाची उभारणी

अभिनेत्री शरलीन चोप्रानं यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. राखी सावंत हिने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला, असेही शरलीन चोप्राने ट्विटमध्ये म्हटले आहे.

छोटा राजन वाढदिवस; उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नवी मुंबई संपर्क प्रमुखाला अटक

मुंबई दि.१५ :- कारागृहात असलेल्या कुख्यात छोटा राजनच्या वाढदिवस छायाचित्र प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी वाढदिवस साजरा करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नवी मुंबई संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांच्याविरोधात गुन्हा केला आणि शनिवारी रात्री त्यांना अटक केली.

मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टचा प्रवास आता एकाच तिकीटात

छोटा राजनचा १३ जानेवारीला वाढदिवस होता. चेंबूरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांनी छोटा राजन याचे छायाचित्र असलेला केक कापून वाढदिवस साजरा केला. समाजमाध्यमांवर या वाढदिवसाची छायाचित्रे प्रसारीत झाल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी सामाजिक शांतता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

भिवंडी येथे तीन बोगस डॉक्टरांना अटक

भिवंडी दि.०७ :- भिवंडी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे भिवंडी शहर पोलिसांनी तीन बोगस डाॅक्टरांना अटक केली आहे. लक्ष्मीनारायण इगा (४६), नरेश बाळकृष्णा (४९) आणि साहबलाल वर्मा (५२) अशी अटकेत असलेल्या बोगस डाॅक्टरांची नावे आहेत.

व्यापार, उद्योग जगताकडून उत्तर प्रदेशात ५ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार

यांचे शिक्षण जेमतेम दहावी, बारावीपर्यंत झाले आहे.‌ खासगी रुग्णालयांमध्ये वाॅर्डबाॅय म्हणून काम केल्यानंतर त्यांनी परिसरात दवाखाने सुरू केल्यची माहिती प्राथमिक समोर आली आहे. बोगस डाॅक्टर दाम्पत्यांनी केलेल्या उपचारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.