मुंबई सेंट्रल येथील बहुमजली इमारतीला आग

मुंबई दि.२७ :- मुंबई सेंट्रल येथील आग्रीपाडा पोलीस ठाण्याजवळ असलेल्या बहुमजली इमारतीला आज सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. इमारतीला आग लागताच धुराचे लोट इमारतीत पसरू लागले.

बोरिवली- विरार पाचवी, सहावी मार्गिका; खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची काम करण्यास ‘एमआरव्हीसी’ ला मान्यता

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. विजेच्या तारा आगीच्या संपर्कात आल्यामुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे इमारतीतील विद्युत यंत्रणा, विद्युत तारा आगीत जळून खाक झाल्या. इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना शिड्यांच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिकेच्या जोडणी कामामुळे दररोज २५० लोकल फेऱ्या रद्द

२५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

मुंबई दि.१० :- मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचे मुख्य काम २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या कामादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे दररोज २५० लोकल फेऱ्या आणि ६१ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.

नायर रुग्णालयाचे फिरते नेत्रतपासणी केंद्र आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचे काम ७ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून २९ दिवस रूळजोडणीचे काम चालू राहणार आहे. नव्या मार्गिकेची सध्याच्या रुळांवर जोडणी देण्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणीनंतर या मार्गाने लोकल चालविण्यात येणार आहेत.

जिहादी दहशतवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्त्राइलच्या पाठिशी उभे राहण्याची आवश्यकता – हिंदु जनजागृती समिती

मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सध्या दोन जलद आणि दोन धीम्या मार्गिका आहेत. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसहून ये-जा करणाऱ्या मेल-एक्स्प्रेस पाचव्या मार्गिकेवरून धावतात. गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान सहाव्या मार्गिकेची जोडणी देण्यात येणार आहे. या सहाव्या मार्गिकेमुळे वाढीव लोकल फेऱ्या चालविण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे.

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल – लोकल वाहतूक मुंबई सेंट्रलपर्यंतच सुरू

चर्चगेट स्थानकादरम्यान आज सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेवर अप दिशेकडे येणारी लोकल वाहतूक चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच सुरू होती. तासाभरानंतर लोकल वाहतूक चर्चगेटपर्यंत सुरू झाली.‌

गावदेवी मंदिराजवळ उभारलेली बेकायदा इमारत तोडण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त द्या

लोकलगाड्या चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच चालविण्यात येत असल्याने ग्रॅन्ट रोड, चर्नी रोड, मरिन लाइन्स आणि चर्चगेटला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्या उदघाटन

मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती झाल्यावर सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकल वाहतूक चर्चगेटपर्यंत सुरू झाली. मात्र लोकल उशिराने धावत होत्या.