हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई दि.२१ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या रविवारी हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.‌

अन्यथा मुंबईतील खासगी तसेच शासकीय बांधकामे थांबविण्यात येतील – महापालिका आयुक्त चहल

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा येथून वाशी / बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे / गोरेगावसाठी जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ – राज्य शासनाचा निर्णय

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मेगाब्लॉक कालावधीत अप-डाउन जलद मार्गावरील लोकल गोरेगाव ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

ऐनवेळी विमान रद्द झाल्याने प्रवासी संतप्त, विमानतळावर गोंधळ

मुंबई दि.१३ :- कोणतीही पूर्वसूचना न देता विमान रद्द झाल्याने प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी विमानतळावर गोंधळ घातला.‌ अमृतसर आणि अहमदाबादला जाणारे ऐनवेळी विमान रद्द करण्यात करण्यात आल्याचा प्रकार घडला. सुमारे एक तास हा गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा गोंधळ आटोक्यात आला.

हेही वाचा :- Dombiavli ; पत्रकाराला लागला डान्सबारचा नाद, घरफोडी प्रकरणात पत्रकार रोशन जाधवला अटक

महापालिका रुग्णालयांत उद्यापासून मुखपट्टी सक्ती

मुंबई दि.१० :- बृहन्मुंबई महापालिका रुग्णालयात उद्यापासून (मंगळवार) मुखपट्टी सक्ती करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच बृहन्मुंबई महापालिका कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी लावावी, असे आवाहनही महापालिका प्रशासनाने केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा- किरीट सोमय्या

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग वाढण्याआधीच महापालिका प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

मुंबईत पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारणार

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाय

मुंबई दि.१० :- हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे कलानगर, मानखुर्द, हाजीअली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावर विचार करण्यासाठी महापालिका प्रशासनातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक महापालिका मुख्यालयात झाली.

महापालिका निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू- राज ठाकरे

हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई महापालिका लवकरच प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करणार आहे. बांधकामे आणि पाडकामांमधून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी ही कार्यपद्धती उपयोगात आणली जाणार आहे. यासोबतच रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी व कचऱ्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणारा कचरा/राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी पश्चिम उपनगरांकरिता गोराई येथे आणि शहर व पूर्व उपनगरे विभागाकरिता प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे.

राज्य अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

रस्त्यावरील धूळ हटवून स्वच्छता करण्यासाठी नवीन ९ इलेक्ट्रिक झाडू विकत घेण्यात येणार आहेत. सध्या महापालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत.
शिवडी, गोवंडी, पंतनगर (घाटकोपर), भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि चारकोप (कांदिवली) अशा पाच ठिकाणी हवा गुणवत्ता संनियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचे कार्यादेश देण्यात आले आहेत. ही पाचही केंद्रे येत्या १५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन

मुंबई दि.०६ :- सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादीत न राहता कला-क्रीडा गुणांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करावा असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी केले.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समालोचक वि. वि. करमरकर यांचे निधन

बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य २०२३’ या कला आणि क्रीडा आविष्कारांचा सांस्कृतिक सोहळा रविवारी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलातील सरदार वल्लभाई पटेल डोम स्टेडियम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

‘म्हाडा’ कोकण मंडळाच्या घरांसाठी येत्या १० मे रोजी सोडत; उद्या जाहिरात

या सोहळ्यास शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजहंस सिंह, सहआयुक्त (शिक्षण) (अतिरिक्त कार्यभार) अजित कुंभार, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, अभिनेते प्रसाद ओक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

उन्हाची तीव्रता आणखी वाढणार, दिवसा उकाडा आणि रात्री थंडी, काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई दि.०१ :- मार्च महिन्याच्या एक तारखेपासूनच उन्हाचा चटका दिवसेंदिवस अधिक वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये, असे आवाहन वेधशाळेने केले आहे.

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १ हजार ५०० ची वाढ

राज्यात काही ठिकाणी दिवसा कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. तर रात्रीच्या वेळेला किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे चित्र राज्यातील काही भागात पाहायला मिळत आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी

विदर्भातील अकोला, वाशिम तसेच रत्नागिरी, अमरावती, पुणे या भागात तापमानात वाढ झाली असून पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होणार आहे. वाढत्या उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाणी भरपूर प्यावे तसेच आहारातही बदल करावा, असेही वेधशाळेने सुचविले आहे

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.२२ :- निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

पॉंडीचेरी , तमाशा लाईव्ह, सहेला रे प्लॅनेट मराठी ओटीटी’वर

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती.

धारावीतील कमला नगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत साठ झोपड्या जळून खाक

दरम्यान आगामी सुनावणीपर्यंत शिवेसना (मुख्यमंत्री शिंदे गट) पक्षाकडून व्हीप जारी केला जाणार नाही, असे आश्वासन शिंदे गटाकडून देण्यात आले. दोन आठवड्यानंतर या याचिकेवर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.

मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर

मुंबई दि.१६ :- मुंबईतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असून स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे. पाकिस्तानातील लाहोर हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२३ या दरम्यानची ही आकडेवारी आहे.

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा शिवजयंती उत्सव साजरा होणार

मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित ठेवण्यासाठी दिल्ली, लखनौप्रमाणे मुंबईतही एअर प्युरीफायर टॉवर बसविण्यात यावेत. शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

घर खरेदीदारांकडून आगाऊ देखभाल शुल्क घेणे बंद व्हावे – मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

मुंबई दि.१५ :- घर खरेदीदारांकडून आगाऊ देखभाल शुल्क आकारणे ‘रेरा’ कायद्याशी विसंगत असून ही पद्धत बंद करावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने ‘महारेरा’चे अध्यक्ष अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. रेरा कायद्याच्या कलम ११ (४) (इ) नुसार, गृहप्रकल्पातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त सदनिकांची विक्री झाल्यावर विकासकाने घर खरेदीदार ग्राहकांची सहकारी संस्था स्थापन करण्याचे बंधन कायद्यात आहे.

बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहर आणि उपनगरात ५५ इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग केंद्रे उभारण्यात येणार

मात्र याला न जुमानता घराचा ताबा देताना घर खरेदीदारांकडून एक वा दोन वर्षांचा इमारतीचा देखभाल खर्च विकासकाकडून आगाऊ वसूल केला जात आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक सदनिकांची विक्री झाल्यानंतर विकासकाने सहकारी संस्था स्थापन करून देण्याचे कायदेशीर बंधन पाळले तर घराचा ताबा देताना घर खरेदीदारांची सहकारी संस्था अस्तित्वात येऊ शकते.

एअर इंडिया ४७० विमाने खरेदी करणार

त्यामुळे सदनिकांचा ताबा घेतल्यावर इमारतीच्या देखभालीची जबाबदारीही घर खरेदीदारांची संस्थेवरच येते. आणि त्यांनी ती घ्यावी, असे रेरा कायद्यात अभिप्रेत आहे. आणि तरीही विकासकाकडून आगाऊ देखभाल शुल्क घेतले जाते ते अयोग्य आहे, असे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी म्हटले आहे. ५० टक्यांहून अधिक सदनिकांची विक्री होताच सहकारी संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबतही विकासकांना आदेश देण्यात यावे, अशी मागणीही मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई दि.११ :- मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या (१२ फेब्रुवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे अप आणि डाऊन पाचव्या – सहाव्या मार्गिकेवर सकाळी ११ ते दुपारी ३.३० या वेळेत हा मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- कुर्ला येथे येणाऱ्या मेल – एक्स्प्रेस कल्याण – ठाणेदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश

हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल, बेलापूरकरिता हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.

राज्यपाल ‘निक्षय मित्र’ झाले! – क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट

पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप – डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवाही बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपरदरम्यान वाहतूक सुरू राहणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.