जनतेने राज्यातील भ्रष्ट सरकार घालवावे- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि.०६ :- राज्य शासनाकडे स्वत:ची जाहिरात करायला, गुवाहाटी आणि गुजरातला फिरायला जाण्यासाठी पैसे आहेत. मात्र, सरकारी रुग्णालयांमधे उपचार घेणाऱ्या जनतेच्या औषधांसाठी पैसे नाहीत. ही अत्यंत संतापनजक बाब असून राज्यातील जनतेने हे भ्रष्ट सरकार घालविले पाहिजे, असे माजी उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.  मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

डोंबिवली नागरी सहकारी बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदान

शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागत असतील तर सरकारी योजनांचे पैसे त्यासाठी का वापरले जात नाही? करोनाची साथ असतानाही राज्यात औषधांचा तुटवडा जाणवला नव्हता. मग आता कोणतीही साथ नसताना राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा का जाणवत आहे? असे प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील शासकीय रुग्णालयांत झालेल्या मृत्यूंवरुन ठाकरे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता २९ नोव्हेंबर रोजी

नवी दिल्ली दि.०१ :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटा यांच्यातील वादामुळे निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली. आता ही सुनावणी येत्या २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.‌

हेही वाचा :- मतपत्रिका, मतदान यंत्रांवर निवडणूक चिन्हाऐवजी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, नाव देण्याची मागणी

राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट, आमदारांची अपात्रता आदी मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एम. आर. शहा, कृष्ण मुरारी, हिमा कोहली, पी. एस. नरसिंह यांच्या घटनापीठापुढे मंगळवारी (१ नोव्हेंबर) ही सुनावणी होणार होती.

हेही वाचा :- नद्यांच्या प्रदूषणाबरोबरच आपले विचार आणि संस्कारही प्रदूषित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित स्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश दिले. त्यासाठी घटनापीठाने तीन आठवड्यांची मुदत दिली. या मुदतीत ठाकरे आणि शिंदे गटाला न्यायालयात कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतरच घटनापीठाकडून या प्रकरणी सलग सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे.