राज ठाकरे यांच्या वक्तव्य नंतर मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण

पुणे दि.०९ :- कोरोना व्हायरसची वाढणारी संख्या देशासाठी अन् विशेषत: राज्यासाठी चिंतेचा विषय बनली असताना काही घृणास्पद प्रकार समोर येत आहेत. मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला? असे वक्तव्य मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केल्यामुळे मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :- थुंकु नका सांगितल्याने कुटुंबाला घरात घुसुन मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल

सर्वसामान्य मुस्लिमांची असुरक्षितता वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तबलिगी जमातने ताबडतोब तोबानामा(माफीनामा) करुन संपूर्ण भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केली आहे. यांसंदर्भात मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी म्हणाले,दिल्लीच्या निजामुद्दिन, मरकजमध्ये तबलिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म दिवसेंदिवस पुढे येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येस तबलिगी जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लिम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. येत्या बुधवारी (8 एप्रिल) शब्बे बारात आहे.

हेही वाचा :- लॉकडाऊन’चा आदेश मोडून ‘कोरोना’ पसरवण्यास सहायक ‘तबलीगी जमात’सारख्या संघटनांवर कठोर कारवाई करा !

या निमित्त लोक मस्जिद मध्येनमाज आदा करतात आणि कबरस्थानात जाऊन प्रार्थना करीत असतात. पंधरा दिवसावर रमजान महिना सूरु होत आहे. मुस्लिम समाजात रमजानला फार महत्व असते.महिनाभर उपास, नमाज, कुराण पठण केले जाते. ईदगाहवर जाऊन सामुदायिक नमाज अदा करण्याबरोबरच आप्तस्वकीय आणि समाजबांधवाना गळाभेट – अलिंगन दिले जाते. हे सर्व कोरोना विषाणू पसरवण्यात आणि ग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात. मानवतेसमोरील या संकटास प्रतिबंध करण्यासाठी सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादित ठेवावेत. शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा आदर करुन सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन डॉ. तांबोळी यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email