ब्राह्मण महासंघातर्फे कोतकर शाळेला टेबल टेनिस टेबल, अन्य साहित्य प्रदान
भालचंद्र वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैद्य कुटुंबीयांची भेट
डोंबिवली दि.०६ :- ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे आज डोंबिवली येथील ज्ञानमंदिर विद्यासंकुलाच्या कोतकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना टेबल टेनिस टेबल आणि इतर साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात चार महिन्यांत ३८ गुन्हे दाखल, ५३ आरोपींना अटक
ही भेट महासंघाचे हितचिंतक अभिजित वैद्य ह्यांच्या माध्यमातून वैद्य कुटुंबीयांतर्फे भालचंद्र वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आली.
मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पाखले, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मानस पिंगळे, कार्यवाह अनघा बोन्द्रे, सह कोषाध्यक्ष उल्हास दाते, कार्यकारिणी सदस्य माधुरी जोशी, विद्यालयातील शिक्षक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.