स्वरा वाघमारे म्रुत्युप्रकरणी शिवनलीनी प्रतिष्ठानने विचारला जाब
डोंबिवली दि.१८ – पश्चिमेकडील मोठागाव येथील प्रमोद वाघमारे यांची ६ वर्षीय स्वराचा दोन दिवसांपूर्वी विषारी सर्पदंशाने म्रुत्यु झाला. स्वराच्या आई-वडील आणि नातेवाईकांनी पालीकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयाला जबाबदार ठरविले आहे. याची गंभीर दाखल घेत शिवनलिनी प्रतिष्ठानने मुख्य वैद्यकिय अधिकारी चंद्रकांत सावकरे यांना पत्र दिले आहे. रूग्णालयात रूग्णाच्या आजारावर योग्य उपचारासाठी तज्ञ डॉक्टर्स नसल्याचे सांगण्यात येते. या रुग्नालयात अतिदक्षता बंद असून कर्मचारी, अधिकारी, नियंत्रण अधिकारी, नर्स वर्गांची यंत्रणा अपूरी आहे. इसीजी यंत्रणा चालवण्यासाठी टेक्निशिअनही नाहीत. दोन ऑपरेशन टेबलपैकी एक खराब असून एक अँम्ब्युलन्स देखिल गँरेजमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत वेळोवेळी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लवंगरे यांना पत्रव्यवहार करूनही कोणते प्रत्युत्तर मिळत नसल्याची खंत वैद्यकिय अधिकाऱ्यांनी यावेळी शिवनलिनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी सर्पमित्र भरत केणे याचाही रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंशाने बळी गेला होता. त्यानंतर आजही रूग्णालयाची परिस्थिती जैसे थे असून अजून बळी तरी किती हवेत असा प्रश्न यावेळी शिवनलिनी प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष दत्ता वाठोरे यांनी उपस्थित केला. यावेळी शिवनलिनी प्रतिष्ठानचे महाव्यवस्थापक अनिरूद्ध कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष गणेश मिश्रा, शहराध्यक्ष दत्ता वाठोरे, समाजसेवक महेश काळे, उमेश अत्तेकर, ध्रु मेहता यांनी तात्काळ रूग्णालयाने उपाययोजना कराव्यात व त्याबाबत लेखी खुलासा करावा अशी मागणी पत्राद्वारे केली.