अभाविप तर्फे युवक सप्ताहाचे औचित्य साधून सूर्य वंदना
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , ठाणे महानगर तर्फे 22 जानेवारी 2021 रोजी युवक सप्ताहाचे औचित्य साधून सूर्य वंदना हा सूर्यनमस्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.१५८ व्या स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने १५८ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सूर्यनमस्कार घालण्यात आले.
स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीचा संपूर्ण विश्वात प्रसार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीत योग साधना ही एक संस्कृती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग परंपरे विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात घेण्यात आला.
या वेळी केंद्रीय कार्यसमिती सदस्य गार्गी वारुंजीकर प्रमुख वक्ता तर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय प्राचार्य श्री.संतोष गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कोंकण प्रांत मंत्री प्रेरणा पवार, कोंकण प्रांत संघटन मंत्री संतोष तोनशाळ , कोंकण प्रांत उपाध्यक्ष प्रा. मारुती शेळके देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणे महानगर अध्यक्ष प्रा. निखिल कारखानीस यांनी केले व ठाणे महानगर मंत्री रमाकांत मांडकुलकर यांनी आभार व्यक्त केले. उपस्थित विद्यार्थ्यांना सूर्य नमस्कार प्रशिक्षणासाठी घंटाळी मित्र मंडळाचे योगाचार्य श्रीकृष्ण म्हस्कर उपस्थित होते.