वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या 1000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे सुरेश प्रभू यांच्या हस्ते राष्ट्रार्पण
नवी दिल्ली, दि.२३ – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या 1000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे उद्घाटन केले. प्रभू यांनी उडपी (कर्नाटक) इथल्या सामायिक सुविधा केंद्राचे उद्घाटन केले, तर कोइम्बतूर (तामिळनाडू) इथे सामायिक सुविधा केंद्रासाठी पायाभरणी केली.
हेही वाचा :- 10 हजारांहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र कार्यान्वित
कोटा (राजस्थान) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) इथल्या मसाला पार्कचे उद्घाटन केले. जोरहाट (आसाम) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) इथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या कॅम्पसचे उद्घाटन केले. कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि दिल्लीजवळच्या मैदानगढी इथे आयआयएफटी कॅम्पसचे तर बनूर (चंदिगढ) इथे फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे प्रभू यांनी उद्घाटन केले.