सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंना धक्का; निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती नाही

 

मुंबई : राज्याच्या सत्तासंर्घषावर आज शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, निवडणूक आयोग, आणि राज्यपालांच्या बाजूने युक्तीवाद करण्यात आला. दिवसभराच्या युक्तीवादानंतर घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती दिली नाही. असा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे निवडणूक आयोग त्यांच्याकडे असलेल्या सर्व याचिकांवर निर्णय घेण्यास मोकळे झाले आहे. हा शिंदे गटाला मोठा दिलासा मानला जात आहे. आता आयोगाला पक्षचिन्हाबाबत निर्णय घेता येणार आहे.

आजच्या सुनावणी वेळी अरविंद दातार यांनी निवडणूक आयोगाच्या वतीने युक्तीवाद केला. ”निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, त्यांचं काम विधीमंडळाच्या अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळ आहे. आरपी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होते. अपात्रतेचा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही,” असे निवडणूक आयोगाचे वकील अरविंद दातार यांनी युक्तीवादावेळी म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published.