बेवारस व्यक्तीला ‘थिंक डिफरंट’ ने दिला आधार.

उरण दि.२३ – उरण चारफाटा येथे मागील ५ ते ६ महिन्यांपासून एक बेवारस व्यक्ती रस्त्यावर, रस्त्याच्या बाजूला जिथे जागा मिळेल तिथे ती नको त्या अवस्थेत राहत होती. त्या बेवारस निराधार व्यक्तिची स्थिती बघता त्यांची प्रकृती खूपच खालावलेली जाणवत होती तो आजारी असल्यासारखे वाटत होते. उरणमध्ये बेवारस व्यक्ति साठी कार्यरत असणारी संस्था ‘थिंक डिफरंट सोशल वेल्फेअर असोसिएशन’ च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या बेवारस व आजारी व्यक्तीला पुढील उपचार करता व पुनर्वसनाकरिता कर्जतमध्ये असलेले भारत वटवानी (मॅगसेस पुरस्कार विजेते) यांच्या श्रद्धा फाउंडेशन मध्ये पुढील उपचाराकरिता दाखल केले. या कामासाठी त्यांना श्रद्धा फाउंडेशन यांच्या कडुन अत्यंत चांगल्या प्रकारची मदत झाली व त्यांना सगळे प्रक्रिया पार पडण्यात कुठेही अडथळे आले नाहीत.

उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांचे योग्य मार्गदर्शन तसेच समाजसेवक संतोष पवार यांची मोलाची मदत व भूपेंद्र घरत यांनी आर्थिक साहाय्य करून त्या निराधार व्यक्तीला आधार दिला.थिंक डिफरंट सोशल वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.उरण परिसरात अशी बेवारस व्यक्ती आढळल्यास त्यांना पुढील उपचाराकरिता व पुनर्वसन करता योग्य ती मदत करू असे असोसिएशनच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी चेतन विशे. (मो. ८६५५३०१०८७), अनिरुद्ध ससे. (मो. ८१०४१२५७८९),अमोल दुरुगकर. (मो. ८६५५५३०५८६)यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन थिंक डिफरंट सोशल वेलफ़ेअर असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.