गुडवीन ज्वेलर्सचे प्रमुख मालक असलेले सुनिलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण यांना अटक

ठाणे दि.१४ :- गुडवीन ज्वेलर्सचे प्रमुख मालक असलेले सुनिलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण हे दोघे भाऊ शुक्रवारी ठाणे न्यायालयात शरण आल्यानंतर ठाणे शहर पोलिसांनी त्या दोघा भावांना अटक केली.

हेही वाचा :- डोंबिवलीत वायू प्रदूषण नसल्याचा दावा

त्यांच्याविरोधात आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तीन गुन्ह्यांसह राज्यात एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत अंदाजे २५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर, त्यांच्याकडून २० कोटींची मालमत्ता आतार्पयत जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.