महाबळेश्वर येथून बोरिवली, ठाण्यासाठी उन्हाळी विशेष जादा बस सोडण्यात येणार
मुंबई दि.१८ :- उन्हाळ्याच्या सुट्टीतील पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन परतीच्या प्रवासासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी विशेष जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर – महाड – बोरिवली / मुंबई सेंट्रल आणि महाबळेश्वर – पुणे – बोरिवली / मुंबई सेंट्रल या मार्गावर या विशेष जादा बस धावणार आहेत.
केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्षयरोग उपचार आणि तपासणी केंद्र सुरू करणार
उन्हाळी विशेष जादा बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत तिकीट दरामध्ये ५० टक्के तर ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनें’तर्गत ७५ वर्षांवरील सर्व प्रवाशांना तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. महाबळेश्वर आगारातून बोरिवली, पुणे, नाशिक, पणजी, ठाण्यासाठी जादा फेऱ्या धावणार आहेत.