पाणीपरवठा करणा-या तलावात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा

-मुंबईकरांना दिलासा, पाणीकपातीपासून सुटका

मुंबई- यंदाच्या मोसमात भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांची पाणी कपातीपासून सुटका झाली आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम लांबणार

गेल्या वर्षी २०२१ मध्ये तलावांत १४ लाख ३४ हजार ३९१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा (९९.१०) टक्के; तर २०२० मध्ये १४ लाख २४ हजार २५७ दशलक्ष लिटर (९८.४०) टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता.

गोदावरी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

बृहन्मुंबई महापालिका जलविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९७.४६ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पुरेसा आहे.

यंदा दिवाळीत ‘हर हर महादेव’! चित्रपटाची झलक सादर
या तलावांमध्ये ७ ऑक्टोबर २२पर्यंत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पाणीकपात करण्यात येणार नाही, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आदि तलावातून पाणीपुरवठा केला जातो.

शिल्लक सेनेचा रडगाणे मेळावा – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published.