dombivali ; अभाविपच्या आवाहनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंबिवली दि.१३ – सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह पंढरपूर शहराच्या आजूबाजूच्या गावांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील नागरिकांना वस्तू रुपात सहाय्य पोहचविण्याची व्यवस्था अभाविप डोंबिवली कडून करण्यात आली होती. ह्या साठी डोंबिवलीत नागरिकांनी सढळ हस्ते मदत केली. औषधे, धान्य (गहू, तांदूळ, डाळ इ.), सुके खाद्यपदार्थ (ready to eat), बिस्किटे, चिवडा, फरसाण, कपडे, सेनेटरी नॅपकिन, ब्लॅंकेट, टॉवेल इ. चे मोठ्या प्रमाणात संकलन अभाविप कार्यालयात झाले. हे सर्व सामान 10 किलोचे एक किट ह्या प्रमाणे 350 किट तयार झाल्या आहेत. ज्यात डाळ, तांदूळ, चहा पावडर, हळद, साखर, तेल, साबण ह्यांचा समावेश आहे. हे सर्व पॅकिंग आणि सॉर्टईंग करण्यासाठी कॉलेजमधील विध्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे अभाविपने आवाहन केले. डोंबिवलीमधील प्रगती कॉलेज, मॉडेल कॉलेज, वंदेमातरम कॉलेज आणि मंजुनाथ कॉलेज ह्यातील NSS युनिटचे 60 हुन अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले.
हेही वाचा :- कोपर उड्डाण पूल श्रींच्या विसर्जनापर्यंत वाहतूकीसाठी खुला ठेवण्याची मागणी

मॉडेल कॉलेजचे प्रा. भोळे सर, प्रा. पटवारी सर, प्रा. सोणम मॅडम, वंदेमातरम कॉलेजचे प्रा. कोल्हे सर, मंजुनाथ कॉलेजचे प्रा. अडीगळ सर, प्रा. पुष्कर सर, प्रगती कॉलेजचे प्रा. पाटील सर, प्रा. इंगळे सर ह्यांनी मोलाचे सहकार्य केले. आज महाविद्यालयात सुट्टी असूनही डोंबिवलीतील महाविद्यालयीन विद्यार्थी युवकांनी मोठया प्रमाणात सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला. आमचा सुट्टीचा दिवस चांगल्या कामासाठी सार्थकी लागला, समाजासाठी काही करू शकलो अशी सुखद भावना सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अभाविप आणि विविध महाविद्यालयातील NSS युनिट मिळून नाविन्यपूर्ण उपक्रम समाजात घेऊन जाऊन सोबत काम करू असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. ह्या सर्वासाठी सुयोग मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन, रा. स्व. संघ जन कल्याण समिती, रा. स्व. समिति, डोंबिवली मधिल विविध सामाजिक संस्था ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ह्या माध्यमातून कोल्हापूर आणि सांगली येथे वस्तू पोहचवल्या जाणार आहेत.