कृष्णप्रियाच्या अदाकारीने रसिक बेहद्द मंत्रमुग्ध जमलेल्या निधीतून विद्यार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२८ – डोंबिवलीच्या रोटरी क्लब डोंबिवली वेस्टने येथिल सावित्रीबाई फुले कला मंदिरात गरजू मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी  यशस्वी क्रियेशनच्या संजना ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कृष्णा प्रिया……मीरा या संत मीराबाईच्या जीवनावरील महा-नृत्यनाटिकेचे आयोजन केले होते. या महानाट्याला, तसेच रोटरीच्या भन्नाट संकल्पनेला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नृत्यनाटिकेत अतिशय सुंदर पणे राधा-कृष्ण आणि मीरा यांचे प्रेम मांडण्यात आले.

नृत्य, गाणी, तसेच सुंदर आवाजातील सूत्रसंचालनाने ही प्रेम कथा संत मीरेचे लहानपणापासूनचे असलेले कृष्णावरील प्रेम व त्यासाठी तीने कृष्णाच्या शोधात केलेके भ्रमण, त्या दरम्यान तिला आलेले अनुभव हे सर्व गाणी आणि निवेदनाच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले. या नृत्यनाटिकेचे दिग्दर्शक अतुल नारंग, तर लेखन विनोद सक्सेना यांनी केले. नृत्यदिग्दर्शन आश्विनी काळसेकर अतुल नारंग आणि सुनीला पोतदार यांनी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीसंकलनातून अकरा गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया रोटरी क्लब डोंबिवली वेस्टच्या रोटरी प्रगती ट्रस्टने प्रायोजित केल्या. तर डोंबिवलीतील इतर 4 क्लबनी प्रत्येकी एक शस्त्रक्रिया प्रायोजित केली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email