भरधाव रिक्षाच्या धडकेत विद्यार्थी जखमी

डोंबिवली दि.२७ – कल्याण पश्चिम शहाड मंगेशी परेडाईज मध्ये राहणारे उज्वल इंगळे यांच्या भाऊ प्रीतेश सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास योगीधाम चौक येथून दुचाकीने घराच्या दिशेने परतत असताना समोरून भरधाव वेगाने रिक्षा आली. या रिक्षाने रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या गाडीला व स्कुतीला धडक दिली. त्यानंतर प्रीतेश च्या दुचाकिला धडक देत प्रीतेश ला फरफटत नेले. या अपघातात प्रीतेश गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रिक्षा चालक सोमनाथ जाधव विरोधात खडकपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email