छात्र शक्ती राष्ट्र शक्ती… ‘अभाविप’चे काश्मीर बचाव आंदोलन

शेखर जोशी यांची आठवणी

नव्वदच्या दशकात काश्मीरमधील परिस्थिती आत्तापेक्षाही भयानक होती. दहशतवादी आणि दहशतवादाने तिथे थैमान घातले होते. अशात श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकविण्याचे आव्हान दहशतवाद्यांनी दिले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे आव्हान स्वीकारले आणि ‘काश्मीर बचाव’ आंदोलनांतर्गत लाल चौकात तिरंगा फडकविण्याचा निर्धार केला. आणि ११ सप्टेंबर १९९० या दिवशी लालचौकात यशस्वीपणे तिरंगा डौलाने, अभिमानाने फडकविण्यात आला. ‘अभाविप’च्या या आंदोलनाचे नेतृत्व आत्ताचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री- सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला तेव्हा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ च्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. ‘अभाविप’च्या १९८५ मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर ‘अभाविप’ची डोंबिवली शाखा फूल स्विंगमध्ये होती. जोश, उत्साह आणि कार्यकर्तेही चांगल्या संख्येत होते. त्यामुळे ‘अभाविप’च्या डोंबिवली शाखेनेही आपल्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांसह या आंदोलनात सहभागी व्हायचे ठरविले.

हेही वाचा :- अभाविपचा डोंबिवलीत जल्लोष

त्यावेळी (१९८५ ते १९८९-१९९० या काळात) ‘अभाविप’च्या डोंबिवली शाखेत मी, माझी बहीण मनिषा, सख्खे चुलत भाऊ-बहिण संजय, वर्षा असे जोशी कुटुंबातील आम्ही चौघेजण एकाच वेळी सक्रिय कामात होतो. नंतर आमचा सहभाग कमी होत गेला पण पुढे आमच्यापैकी संजय कामात राहिला, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणूनही बाहेर पडला. काश्मीर आंदोलनासाठी डोंबिवलीतून जास्तीत जास्त कार्यhकर्ते जावेत यासाठी डोंबिवलीतील जुन्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांकडून सर्व कार्यकर्त्यांच्या घरोघरी प्रत्यक्ष संपर्क साधून, पालकांशी बोलून या आंदोलनासाठी पाल्याला पाठविण्याची विनंती करण्यात आली होती. आमच्या घरी संगीता आंबेकर, अर्चना फाटक (आणखी कोणी असतील तर नावं आठवत नाहीत) या आल्या होत्या. घरी भाऊंशी, (आम्ही वडिलांना भाऊ म्हणायचो) आईशी बोलणे झाले. मी तेव्हा ‘मुंबई सकाळ’ मध्ये नोकरीला लागलो होतो. रजा मिळणार नसल्याने इच्छा असूनही मला तसेच काही कारणाने संजय आणि वर्षा यांनाही जायला जमले नाही. आमच्या घरातून फक्त मनिषा या आंदोलनासाठी गेली होती. त्यावेळी तिचे कॉलेज ( बी.ए.)संपून एक वर्ष झाले होते.

हेही वाचा :- ‘कलम 370 रद्द’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

कार्यकर्ते येऊन गेल्यानंतर घरी चर्चा झाली. मनिषाने स्वतःहून आंदोलनात सहभागी व्हायचे ठरविले होते. आईचा काळजीपोटी विरोध होता. भाऊंचा मनिषाच्या निर्णयाला पाठिंबा होता. मनिषा आंदोलनासाठी काश्मीरला जाणार हे कळल्यानंतर परिचित, नातेवाईक यांच्याही संमिश्र प्रतिक्रिया होत्या. काहींनी काळजीपोटीच मनिषाला, भाऊंनाही या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण मनिषा, भाऊही निर्णयाशी ठाम होते. अनेकांनी भाऊंना, अहो तुमच्या मुलीला एकटीला तिकडे पाठविण्याचा निर्णय का घेतला? तुम्हाला तिची काळजी नाही का? भीती वाटत नाही का? असे प्रश्न विचारले होते. त्यावर भाऊंनी दिलेले उत्तर माझ्या आजही लक्षात आहे. भाऊ म्हणाले होते, शिवाजी महाराज जन्माला यावे पण ते आपल्या घरात नको तर शेजारच्या घरात येऊ दे, असे आपल्या प्रत्येकाला वाटत असते.

हेही वाचा :- फाईल हरवली की चोरी झाली?, महापालिकेत आयुक्त कार्यालया सह सर्वच विभागात फाईलची शोधाशोध

पण असा विचार केला तर कसे चालेल? काही चांगले घडत असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून का नको? त्यासाठी काही किंमत चुकवावी लागली तरी त्याला आपली तयारी हवी. तिथे इतरही विद्यार्थी जाणार आहेत, त्यामुळे जे सगळ्यांचे होईल तेच माझ्या मुलीचेही होईल. ‘जहॉं हुआ तिरंगे का अपमान वही करेंगे उसका सन्मान’या निर्धारासह झालेल्या या काश्मीर बचाव आंदोलनात संपूर्ण देशभरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, ज्या गटात मनिषा होती, त्या विद्यार्थ्यांना उधमपूर येथे एका शाळेत स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. त्यामुळेे मनिषाला लाल चौकात पोहोचून राष्ट्रध्वज फडकविण्याच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही आणि याची खंत मनिषाला आजही वाटते. पण तरीही उधमपूरपर्यंत जाऊन मनिषाला या आंदोलनात खारीचा का होईना वाटा उचलता आला आणि काश्मीरमधील त्यावेळच्या परिस्थितीत मनिषा तिथपर्यंत गेली याचा आम्हा जोशी कुटुंबियांना आणि मनिषालाही नक्कीच अभिमान आणि आनंद आहे.

३७० पर लद्दाख से युवा सांसद ने विरोधियो की अभूतपूर्व धुलाई की. विपक्ष की बोलती बंद कर दी.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email