कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संपूर्ण भागात पुढील आदेशापर्यंत नियम सख्त

1)कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संपूर्ण भागात पुढील आदेशापर्यंत किराणा माल दुकान सुरू ठेवून विकण्यास संपूर्ण पणे बंदी घातलेली आहे. मात्र किराणा दुकानदार हे त्यांच्या दुकानातुन मोबाईलद्वारे अगर व्हाट्स अँपद्वारे किराणा मालाची ऑर्डर घेऊन घरपोच किराणा माल देऊ शकतात.

2) कोणताही भाजीपाला दुकानदार रस्त्यावर किंवा दुकानात भाजीपाला विक्री करणार नाही. मात्र त्यांच्या दुकानातुन मोबाईलद्वारे, व्हाट्स अपद्वारे भाजीपाल्याची ऑर्डर घेऊन घरपोच भाजीपाला देऊ शकतात.

3) तसेच कोणीही फळ विक्रेता रस्त्यावर किंवा दुकानात विक्री करणार नाही. मात्र फळविक्रेत्यांना मोबाईलद्वारे, व्हाट्स अपद्वारे फळविक्रीची ऑर्डर घेऊन घरपोच फळे देता येतील.

4) तसेच कोणताही दुकानदार हा रस्त्यावर किंवा दूध डेअरीत दुधाची विक्री करणार नाही. डेअरीत दूधविक्री करण्यास बंदी घातलेली आहे. मात्र दूधविक्रेत्यांना मोबाईलद्वारे किंवा व्हाट्स अपद्वारे दूधविक्रीची ऑर्डर घेऊन मागणीप्रमाणे घरपोच दुधविक्री करू शकतात.

5) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोणीही व्यक्ती कोणताही किराणा माल, भाजीपाला, दूध फळे खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडणार नाही. किंवा स्वतः ची वाहने रस्त्यावर आणणार नाहीत.

6) जिल्हाधिकारी ठाणे यांनी संपूर्ण कल्याण व डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दोन चाकी, वाहने रस्त्यावर आणण्यास संपूर्ण बंदी घातलेली आहे.

7) तसेच कोणतेही चार चाकी वाहने रस्त्यावर आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.

8) तसेच कोणत्याही व्यक्तीस विनाकारण घराबाहेर पाडण्यास बंदी घातलेली आहे.

9) यामध्ये आत्याआवश्यक सेवा बजावणारे डॉक्टर्स व नर्सेस तसेच वॉर्डबॉय यांना त्यांच्या कामावर जाण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे.

10) मेडिकल दुकानांना त्यांचे मेडिकल सुरु ठेवण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे.

11) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच सफाई कामगार यांना त्यांच्या कामावर जाण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे.

12) तसेच करोना या आजाराचे संबंधाने भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाने नेमणूक केलेले अधिकारी व कर्मचारी यांनाच त्यांच्या कामावर अगर शासनाने नेमून दिलेल्या कर्तव्यावर त्यांना जाता येईल.

13) तसेच कोणी व्यक्ती आजारी असेल आणि त्यांना उपचारांची गरज आहे अशा व्यक्तींना मेडिकल emergency साठी सूट देण्यात आलेली आहे.

14) कोणीही व्यक्ती विनाकारण दोन चाकी, चार चाकी वाहने रस्त्यावर आणेल त्यांच्या गाड्या जप्त करण्यात येतील आणि त्याव्यक्तींवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

15) या लॉकडाउनच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा दुकानेनबंद राहतील. जे कोणी मुद्दामहून दुकानें चालू ठेवतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सर्व जनतेने घरातच थांबून कोरोनाला आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही डिसीपी विवेक पानसरे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published.