परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान सहन न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

संगमनेर दि.३० :- संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे भाऊबीजेच्या दिवशी एका शेतकऱ्याने नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली असून दशरथ सुभान वाघमारे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वाघमारे यांच्या शेतात तीन एकर कांदा आणि इतर पिकाचे मागील १० दिवसांपासून सततधार पाऊस सुरु असल्याने मोठे नुकसान झाले.

हेही वाचा :- लक्ष्मी पूजनसाठी घरी जात असताना भिवंडी -वाडा रस्त्यावर खड्डयांमुळे दुचाकीस्वाराचा बळी

त्यामुळे ते गेल्या पाच-सहा दिवसांपासून तणावात होते. मंगळवारी सकाळी कुटुंबीयासह दिवाळीचा फराळ घेतल्यानंतर त्यांनी शेतात फेरफटका मारला. मात्र पावसामुळे झालेले नुकसान त्यांना सहन झाले नाही. लागवडीच्या काळात घेतलेले सरकारी सोसायटी व पत्तसंस्थाचे कर्ज कसे फेडायचे यांची चिंता त्यांना होती. त्यातूनच त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच वाघमारे यांना अत्यावस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुपारी अखेर त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.