स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे २८ मे रोजी मॉरिशसमध्ये अनावरण

मुंबई दि.२६ :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त यंदाचे सावरकर विश्व संमेलन येत्या २८ मे रोजी मॉरिशसमध्ये आयोजित करण्यात आले आहे‌. मॉरिशसमध्ये उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरणही यावेळी होणार आहे.

जी – २०’ गटाच्या शिष्टमंडळाकडून ‘आपदा’मित्र आणि ‘आपदासखींचे कौतुक!

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मॉरिशस येथे होणाऱ्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन हे ही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळ परिसरात एक दिवस पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक याबाबत रवींद्र चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.