खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या विरोधात परिवहन आयुक्तांकडून कारवाईचे आश्वासन

हिंदू जनजागृती समितीचे परिवहन आयुक्तांना निवेदन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.१८ :- खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रचंड भाडेवाढ करून प्रवाशांची लुटमार केली जाते.‌ आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत सोमवारी महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांना निवेदन देण्यात आले. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन परिवहन आयुक्त भीमनवार यांनी हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

हेही वाचा :- एक कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास

मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रवाशांना तक्रारीसाठी देण्यात आलेली लिंक उघडत नसल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिल्यावर ती दुरुस्त करण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले. तक्रारीसाठी दिलेल्या दूरध्वनीवर कोणी उचलत नसल्याचे सांगितल्यानंतर ‘व्हॉट्सअप’वर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आयुक्तांनी सांगितले. शिष्टमंडळाने नोंदविलेल्या तक्रारींवर उपाययोजना करण्याबाबत मासिक बैठकीमध्ये सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना देण्यात येतील, असेही परिवहन आयुक्त म्हणाले.

हेही वाचा :- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मान्यता

या शिष्टमंडळात अधिवक्ता किशोरी कुलकर्णी, भगवा गार्डचे राष्ट्रीय समन्वयक अवधूत वसंत, ‘नॅशनल प्रोग्रेस यूथ असोसिएशन’चे रोहिदास शेडगे आणि ‘सुराज्य अभियाना’चे अभिषेक मुरुकटे याचा समावेश होता.‌

हेही वाचा :- दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात ११० बस दाखल होणार

दरम्यान हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियना’च्या अंतर्गत केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांची आर्थिक लुटमार थांबावी, यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकींग सेंटरवर शासनमान्य तिकिटदर लावण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी २५ ऑगस्टला दिले होते; परंतु राज्यातील बहुतांश ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकींग सेंटरवर अद्यापही शासनमान्य तिकिटदर लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील जळगाव, पेण, सातारा, कराड, अमरावती, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, कल्याण, चंद्रपूर आणि अकोला अशा १६ ठिकाणी प्रादेशिक-उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.