प्रस्तावित/मंजूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची संख्या

नवी दिल्ली, दि.२९ – रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री मनसुख एल. मांडवीय यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना प्रस्तावित/मंजूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची माहिती दिली. महाराष्ट्रातील प्रस्तावित/मंजूर प्रकल्पांची संख्या 2017-18 मध्ये 102 होती. यासाठी निधीची तरतूद 17088 कोटी रुपये आहे. गोव्यातील प्रस्तावित/मंजूर प्रकल्पांची संख्या 2017-18 मध्ये एक होती. यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद आहे. महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर 2018-19 पर्यंत 16 कामे पूर्ण झाली तर गोव्यात 4 कामे पूर्ण झाली. देशभरात एकूण 307 कामे पूर्ण झाली आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email