राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर अशी होणार निवडणूक….

(मुंबई आसपास ब्यूरो)

नवी, दिल्ली दि.२१ – मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्याद्वारे दोन्ही राज्यात त्वरित आचारसंहिता लागू झाली आहे. दोन्ही राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची विस्तृत घोषणा केली.

हेही वाचा :- Dombivali ; सेनेच्या युवराजांसाठी खड्डेभरणी; करदात्यांना किंमत नाही?

निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबरला देण्यात येणार असून त्यानंतर ०४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ०५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. ०७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेता येतील. निवडणूक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात २८८ विधानसभा जागांवर ८.९४ कोटी मतदार १.८ लाख ईव्हीएमद्वारे मतदान करतील.

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?

Leave a Reply

Your email address will not be published.