१० रुपयांत जेवण ठाण्यात शुभारंभ

(म.विजय)

ठाणे दि.१८ :- १० रुपयांत जेवणाचा पहिला मान ठाण्याचा असं निमंत्रण देत ठाणे-बेलापूर पेठेतल्या गर्दीच्या ठिकाणी याच परिसरातील खारटन रोड येथील अतिशय सामान्य कुटुंबातील तरुणांनी एकत्र येत बाबांचा ढाबा या नावानं १० रुपयांत जेवण या सेवाभावी योजनेची सुरूवात केली. ज्येष्ठभ् पत्रकार कैलाश म्हापदी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या उपक्रमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं १० रुपयांत जेवण ही झुणकाभाकर सारखी योजना जाहीर केली.

हेही वाचा :- १० वी १२ वी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

तिचं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सेवाभावी संस्था व व्यक्तींनी अनुकरण करायला सुरूवात केली. सरकार करेल तेव्हा करेल प्रथम आपण प्रयत्न करू या भावनेनं ठाण्यात लफाटा चाळ या नावानं प्रसिद्ध असलेल्या ठामपा सफाई कामगारांच्या खारटन रोड वस्तीतील कामगारांच्या मुलांनी खिशाला चाट देवून हे सेवाकार्य सुरू केले. यात भात-आमटी, चपाती-भाजी असा गरमागरम मेनू असलेल्या या स्टॉलवर दुपार उलटल्यानंतरही भुकेलेल्यांची पावलं वळत होती. मोठ्या प्रमाणावर मजूर कामगार आणि वाटसरूंसाठी ही पर्वणीच ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.