दोन महिन्यापासून बंद असलेले डोंबिवलीतील सावित्रिबाई फुले नाटयगृह तातडीने सुरु करा
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०८ – सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत गेले दोन महिने महापालिकेचे सावित्रिबाई फुले नाटयगृह बंद आहे. त्यातच हे दिवस आता शालेय नाट्यसंमेलनाचे असल्याने ते कुठे घ्यायचे असा प्रश्न शाळा चालकांपुढे निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराची दखल घेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शहर अभिंयत्यांसह अधिकाऱ्यांच्या टीम तातडीने सावित्रिबाई फुले नाटगृहात पाहणी केली. सावित्रिबाई फुले नाटयगृह काम तातडीने सुरु करुन नाटगृह लवकरांत लवकर सुरु करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. गेल्या दोन महिने सावित्रिबाई फुले नाटगृह बंद असल्याने महापालिकेचे रोज सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान होत आहे पण भोंगळ कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही.
हेही वाचा :- शाश्वत स्वच्छतेचा संदेश देणारी एलईडी व्हॅन फिरणार गावोगावी
त्यातच डिसेंबर ते फेबु्रवारी या तीन महिन्यात शाळांची स्नेहसंमेलनेही घेता येणार नसल्याने विद्यार्थीही नाराज झाले आहेत. नव्याने महापालिकेत सेवेत रुजु झालेल्या शहर अभिंयता स्वप्ना कोळी, प्रकल्पप्रमुख तरुण जुनेजा, शहर अभियंता सुभाष पाटील, विद्युत विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुर्हेकर आदि अधिकारी सावित्रिबाई फुले नाटयगृहात आले त्यानी सर्व नाटयगृहाचे पहाणी करुन नाटयगृहातील सर्व दिवे व इतर सुविधा योग्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फक्त वातानुकुलित यंत्रणेचे काम शिल्लक असल्याने ते तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच ज्या ठेकेदाराला हे काम दिले, त्यांना तातडीने काम सुरु करण्यास सांगण्याचे निर्देश त्यांनी दिले. निविदा मंजूर झाली असून मंजूरीची प्रेसेस सुरु करण्यास त्यांनी सांगीतले. तसेच येत्या दोन महिन्यात नाटयगृह तातडीने सुरु करण्यास त्यानी बजावले.
हेही वाचा :- देशातल्या प्रमुख ९१ धरणातल्या पाणी साठ्यात २ टक्क्यांनी घट