दिवाळी सुट्टीनिमित्त एसटीची हंगामी भाडेवाढ

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- दिवाळी सुट्टीनिमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हंगामी दरवाढ केली आहे. येत्या २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने ही हंगामी भाडे आकारणी केली जाणार आहे. ही हंगामी ही भाडेवाढ येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे.

दिवाळी सुट्टीनिमित्त, एसटीच्या विशेष गाड्या

गर्दीच्या हंगामात महसूल वाढीसाठी ३० टक्क्यांपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार ही हंगामी भाडेवाढ लागू केली जाणार आहे.

दिवाळीनिमित्त ‘बेस्ट’ योजना

साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि शयनआसनी बसला ही भाडेवाढ लागू असेल. शिवनेरी आणि अश्वमेध या बसगाड्यांना या हंगामी भाडेवाढीतून वगळण्यात आले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुट्टी

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशांकडून वाहकाकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येणार आहे.

महामुलाखतीचा महाफुसका बार – शेखर जोशी

एसटीच्या आवडेल तिथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक आणि विद्यार्थी पासना ही हंगामी भाडेवाढ लागू केली जाणार नाही.‌

लम्पी आजाराने राज्यात चार हजार जनावरांचा मृत्यू

येत्या १ नोव्हेंबरपासून ही हंगामी भाडेवाढ संपुष्टात येणार असून नेहमीप्रमाणे सामान्य तिकीट दर आकारले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.