डोंबिवलीत बुध्दीबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

{श्रीराम कांदु}

डोंबिवली दि.२४ :- डोंबिवलीत १२ वर्षाखालील खालील विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब डोंबिवली मिडटाऊने बुध्दीबळ स्पर्धा रविवारी रोटरी भवन येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत जवळपास ७० हून अधिक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये आठ वर्षाखालील, दहा वर्षाखालील व बारा वर्षाखालील अशा तीन गटात ही स्पर्धा आयोजित केली होती.

हेही वाचा :- डोंबिवलीचे ‘ भोपाळ ‘ होणार अशी भीती मुद्दाम निर्माण केली जात आहे 

त्यामध्ये पहिल्या गटात निरव अढाळकर व हर्षा पाटील, दुसऱ्या गटात अर्थव सोनी, मनाली हर्डीकर, तर तिसऱ्या गटात आर्या राठोड, श्रावणी सोमण हे प्रथम क्रमांक मिळवून विजयी झाले. या स्पर्धेत वसईपासून बदलापूरपर्यंत शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजयी विद्यार्थ्यांना एडीजी रो. अभय कोठारी, मिडटाऊनचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव जितेंद्र नेमाडे, टिडीसीचे चीप तांडेल यांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा :- व्हाईट रिव्हॉलूशनच्या उपक्रमात 100 लिटर दुध जमा

यावेळी बुध्दीबळ स्पर्धा प्रोजेक्टचे प्रमुख किशोर अढळकर म्हणाले, लहान शालेय विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित करण्याचे कारण अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याने बुध्दीचा विकास, मनाची एकाग्रता वाढते. त्याचा फायदा अभ्यासात चांगला होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बौद्धिक विकासासाठी नेहमी अशा स्पर्धांमध्ये नेहमी भाग घ्यावा, असे आवाहन रो. अढळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. यावेळी सर्व मिडटाऊचे रोटरीयन, पालक मोठ्या संख्येने उपस्थित सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.